कसे मिळाले शामीच्या ‘डबल हीट’ ला ‘ट्रिपल मॅक्सिमम’ने उत्तर

Mohammed Shami

क्रिकेट हा मोठा बेभरवशाचा खेळ आहे. यात केंव्हा काय होईल ते सांगता येत नाही. आता हेच पहा ना…गुरुवारी किंग्ज इलेव्हनच्या (KXIP) मोहम्मद शामीने (Mohammed Shami) एकाच षटकात एबीडी विलियर्स (AB devilluers) व विराट कोहली (Virat Kohli) यांना बाद केले.

आता हे दोघे कोणत्या दर्जाचे फलंदाज आहेत ते सांगायची गरज नाही आणि या दोघांनाही तीन चेंडूच्या अंतरात बाद करणारा गोलंदाजही कसा असेल हेसुध्दा सांगायची गरज नाही पण क्रिकेट जसा बेभरवशाचा तसाच कुणावर दयामायासुध्दा न दाखवणारा खेळ आहे. म्हणून ज्याने डीविलियर्स व कोहलीला बाद केले त्याच मोहम्मद शामीच्या पुढच्या षटकात ख्रिस मॉरिस व इसुरु उदानासारख्या साधारण फलंदाजांनी 24 धावा फटकावून काढल्या.

4, 1, 6, 1, 6 आणि 6 असे फटके लागले. मॉरिसने दोन षटकार व एक चौकार लगावला तर उदानानेही एक षटकार लगावला.

असंच काहीसं पंजाब इलेव्हनच्या संघाबाबतही झालं. 30 चेंडूत 46 धावा हव्या असताना के.एल. राहुल व ख्रिस गेल यांनी 12 चेंडूत 35 धावा चोपून काढल्या पण त्यांनाच पुढच्या 17 चेंडूत फक्त 10 धावाच करता आल्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर सामना गेला आणि निकोलस पूरनने षटकार लगावुन पंजाबच्या पराभवांची मालिका खंडीत केली. शेवटच्या षटकात पहिल्या पाच चेंडूत गेल व राहुलसारख्या फलंदाजांना रोखून धरणारा युझवेंद्र चहल शेवटी एका चेंडूवर एक धाव रोखू शकला नाही.

यामुळे क्रिकेटच्या अनिश्चिततेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आणि या खेळाला गेम आॕफ ग्लोरियस अनसर्टनिटीज का म्हणतात ते कळून चुकले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER