‘थोडी तरी लाज बाळगा’, मालदीवमध्ये सुट्या घालवणाऱ्या कलाकारांवर नवाझुद्दिन संतापला

nawazuddin siddiqui - Maharastra Today
nawazuddin siddiqui - Maharastra Today

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचे शुटींगसुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच काळात बॉलीवूडमधील अनेक कलाकार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव आणि इतर ठिकाणी गेले आहेत. मात्र, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी त्या सेलेब्रिटींना चांगलेच फटकारले आहे. नवाजुद्दीन अशा बॉलिवूडकरांवर (Bollywood) टीका करताना म्हणाला की, ‘लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाहीय आणि तुम्ही पैसे उधळत आहात. थोडी तरी लाज बाळगा.’

वास्तविक, स्पॉटबॉयच्या अहवालानुसार नवाजुद्दीन यांना सेलेब्रिटींच्या व्हेकेशन ट्रीपची माहिती मिळाली आणि जेव्हा तिथून त्यांनी फोटो शेअर केले तेव्हा नवाजुद्दीन म्हणाला की, ते लोक कशाबद्दल बोलतील? अभिनयाबद्दल? या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनवले आहे. त्यांची पर्यटन उद्योगाशी काय व्यवस्था आहे हे मला माहिती नाही. पण माणूस म्हणून कृपया आपल्या सुट्टीतील फोटो आपल्याकडे ठेवा ही विनंती. प्रत्येकजण येथे या कठीण काळाला सामोरे जात आहे. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. ज्यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, अशामध्ये तुमच्या सुट्टीचे फोटो त्यांना दाखवून त्यांचा धीर खचू देऊ नका.

नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, ‘आम्ही मनोरंजन करणारे लोक आहोत, आपल्याला थोडे मोठे झाले पाहिजे. जर बरेच लोक आपले अनुसरण करतात हे आपल्याला माहित आहे तर, आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.’ नवाजला, तुम्ही कधी मालदीवला जात आहात? असे विचारले असता तो म्हणाला की, अजिबात नाही मी सध्या ‘बुधाल’ला माझ्या गावी आहे आणि माझ्या कुटुंबांसोबत राहत आहे, असं त्याने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button