संजय राठोड मंत्र्यांच्या संपर्कात, योग्यवेळी सर्वांसमोर येतील : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai - Sanjay Rathod

कराड : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) नॉट रिचेबल असून ते अद्याप समोर आलेले नाहीत. त्यावरुन विरोधकांनी सरकारला आणि खास करुन शिवसेनेला (Shiv Sena) चांगलंच लक्ष्य करत आहे. संजय राठोड या प्रकरणावर कधी बोलणार? असा प्रश्न विरोधकांसह माध्यम प्रतिनिधीही विचारत आहेत. या प्रश्नाचं उत्तर आता गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिलं आहे. संजय राठोड हे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. योग्य वेळ येताच ते माध्यमांसमोर येतील, असं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे संजय राठोड आता लवकरच माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होतं. पण आता मंत्री महोदय 10 दिवस गायब असतात. कुणालाच सापजत नाहीत. यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते? अहो रोज तुमच्यासोबत बसणारा सहकारी मंत्री 11 दिवस गायब आहे. त्याला तरी शोधा, असं ट्वीट करत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना टोला लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER