ना. शंभूराजे देसाई यांनी भरली कोयनामाईची ओटी

Shambhuraje Desai

सातारा : प्रतिवर्षी 15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पूर्ण करणारा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने यंदा 31 ऑगस्ट 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलंडला. 100 टी.एम.सी.ने धरण भरल्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची ओटी भरुन पूजन करण्यात येते.

यावेळी कोयना धरणातील
शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपूजन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई (Shambhu Raje Desai ) यांचे हस्ते करण्यात आले.

एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणात 31 ऑगस्ट रोजी सकाळी 101.57 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. प्रतिवर्षी 15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पूर्ण करणारा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने यंदा 31 ऑगस्ट 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलंडला. 100 टी.एम.सी.ने धरण भरल्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची ओटी भरुन पूजन करण्यात येते.

यावेळी कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयनानगरचे स.पो.नी. महेश बावीकट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून पूर्णत: कमी करण्यात आला आहे. आजअखेर कोयना धरणातून सहा वक्र दरवाजातून पूरपरिस्थितीत 19.65 टीएमसी तर पायथा वीज गृहातून 1.86 टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER