भारताची पहिली महिला सिव्हील इंजिनीअर ज्यांनी काश्मीर ते अरुणाचलपर्यंत बांधले ६९ पूल !

भारतात रस्ते आणि पूल  बांधून भारताच्या विकासाच्या चाकाला गतिमान करण्याचे कार्य अनेकांच्या हातून झाले. रस्ते आणि पुलाच्या सुविधा मूलभूत गरजा असून त्या प्रगतीच्या वाटा खुल्या करतात. यासाठी योगदान देणाऱ्यांना नेहमी विशेष स्थान समाजात मिळतं; पण पहिल्या महिला सिव्हील इंजिनीअरने तब्बल ६९ पूल उभारले असतील तर अनेकांच्या माना अभिमानाने आपोआप उंचावतील. ही गोष्ट आहे शकुंतला एस. भगत (Shakuntala S. Bhagat) यांची. त्यांच्या ‘क्वाड्रीकॉन’ कंपनीनं इंग्लंड, अमेरिका आणि जर्मनीसह जगभरात २०० हून अधिक पुलांचा आराखडाही तयार केलाय.

शकुंतला यांचा जन्म १९४७ ला मुंबईत झाला. वीरमाता जिजाबाई इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. असे करणाऱ्या त्या पहिला महिला होत्या. पूल उभारणीसाठी संशोधन आणि आराखडा सुधारण्यात त्यांनी विशेष योगदान दिलंय. पुढं शकुंतला यांचा विवाह अनिरुद्ध एस. भगत यांच्यासोबत झाला. ते एक मॅकेनिकल इंजिनीअर होते. या दांपत्याने पहिल्यांदा ‘टोटल सिस्टिम’ पद्धतीचा विकास केला. सिस्टिमनुसार पूल  उभारताना त्याची लांबी, रुंदी, आराखडा इत्यादी गोष्टींमध्ये मूलभूत बदल घडवून आणले. कमी खर्चात अधिक काळ टिकणाऱ्या अधिक क्षमतेच्या पुलांची उभारणी त्यांच्याकडून करण्यात आली.

क्वाड्रीकॉन स्टील पूल   हिमाचलमध्ये जास्त आढळतात आणि तिकडे या पुलांना मोठी लोकप्रियता प्राप्त आहे. हिमाचलच्या पर्वतीय क्षेत्रात असे पूल  जास्त प्रमाणात दिसून येतात. इथल्या अनेक भागांत पूल  बांधणीचं काम अशक्य मानलं जायचं; पण शकुंतला भगत यांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.

कॉंक्रिट व्यवसाय

१९६० ला शकुंतला यांनी अमेरिकेतल्या पेन्सलव्हेनिया विद्यापीठातून ‘सिव्हील अँड स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग’ या विषयात त्यांनी मास्टर्स डिग्री पूर्ण केली. यानंतर आयआयटी मुंबईमध्ये त्यांनी सिव्हील  इंजिनीअरिंगच्या शाखेत सहायक प्राध्यापक म्हणून काम केलं तर ‘हॅवी स्ट्रक्टर लॅबोरेट्री’च्या त्या प्रमुख होत्या.

१९७० ला भगत दांपत्यानं ‘क्वाड्रीकॉन’ची स्थापना केली. ही एक पूल निर्माण करणारी कंपनी होती. पुलाच्या रचनेत यांनी मूलभूत बदल करत डिझाईनचं पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतलंय. जगभरातील दऱ्याखोऱ्यात, दुर्मिळ भागांपासून ते शहरांपर्यंत सर्व प्रकारच्या भौगोलिक अडीअडचणींवर मात करण्याची क्षमता शकुंतला यांनी बनलेल्या डिझाइन्सचा वापर करून तिथल्या पुलांची कामं पूर्ण  करण्यात आली.

जगभरातील अमेरिका, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या प्रमुख राष्ट्रांमध्ये त्यांनी पूल बांधणीचं काम केलंय. लंडनच्या ‘सिमेंट अँड कॉंक्रिट असोसिएशन’साठी संशोधन करणाऱ्या शकुंतला ‘इंडियन रोड कॉंग्रेस’ या संघटनेच्या सदस्य होत्या.

क्वाड्रीकॉनद्वारे पूर्ण करण्यात आलेली कामं

‘टोटल सिस्टिम्स’ पद्धतीचं पेटंट याच कंपनीनं बनवलंय. या आविष्कारासह कंपनीनं १९७२ ला हिमाचलप्रदेशच्या स्पीती भागात पहिला पूल बनवला. चार महिन्यांनंतर त्यांनी दोन आणखी नवे पूल बनवले. लवकरच इतर राज्य आणि देशभरात या तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार झाला. १९७८पर्यंत कंपनीने काश्मीरपासून ते हिमाचलपर्यंत ६९ नवे पूल बनवले होते.

ही कामं कर्जाऊ रकमेवर पूर्ण  करण्यात आली होती. सरकारी बँका म्हणा की खासगी गुंतवणूकदार कुणीच या कंपनीत सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करायला तयार नव्हतं. भारतासारख्या विकसनशील देशात ‘क्वाड्रीकॉन’ असे पूल बांधणीचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होती, ज्याचा वापर विकसित देशातही झाला नव्हता. आजपर्यंत शकुंतला यांनी जगभरातल्या २००हून अधिक पुलांचे डिझाईन पतीच्या साथीने पूर्ण केले.

पुरस्कार आणि सन्मान

स्टीलचा वापर करून पुलांची बांधणी करताना वेल्डिंगद्वारे जोडणी करताना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळं पूल बांधताना वेल्डिंगचा वापर टाळावा लागतो. यावर उपाय म्हणून १९६८ला शकुंतला यांच्या पुढाकारानं क्वाड्रीकॉननं ‘युनीशर कनेक्टर’चा विकास केला. स्टीलच्या जोडणीसाठी हे महत्त्वपूर्ण ठरतं. या संशोधनासाठी भगत दांपत्याला  १९७२ ला ‘इवेंशन प्रोमोशन बोर्ड’द्वारे सन्मानित करण्यात आलं होतं.

१९९३ ला  ‘वुमन ऑफ द इयर’ या किताबानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१२ ला वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी जगाला अखेरचा निरोप दिला.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER