शक्ती मलिक हत्याकांड : तेजस्वी व तेजप्रताप यादवविरुद्ध गुन्हा दाखल

Tejpratap Yadav - Tejaswi Yadav - Shakti Malik

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) माजी नेते शक्ती मलिक (Shakti Malik) यांच्या हत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी (Bihar Police) रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav), राजदचे नेते तेजप्रताप यादव (Tejpratap Yadav) व अनिल कुमार साधू (Anil Kumar Sadhu) यांच्यासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

मलिक यांच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीवरून तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात षडयंत्र रचून हत्या केल्याच्या आरोपात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

रविवारी सकाळी राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या घरात घुसून हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या . मलिक यांच्या पत्नीने या प्रकरणी सायंकाळी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार नोंदवली. मलिक यांच्या कुटुंबीयाचा आरोप आहे की आरोपी सतत शक्ती मलिक यांना जीवे मारण्याची धमकी देत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER