शक्ती कपूर करतोय नार्कोटिक्स ब्यूरोच्या अधिकाऱ्याची भूमिका

Shakati Kapoor- SSR

अभिनेता सुशांत सिंहच्या (SSR) मृत्यूनंतर तपासाची दिशा बॉलिवूड (Bollywood) कलाकार आणि त्यांच्या ड्रग्जशी असलेल्या संबंधावर वळली आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्तीने (Riya Chakraborty) बॉलिवूडमधील कलाकारांची काही नावे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यातूनच दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरचे नाव पुढे आले आहे. एनसीबीने (NCB) या चौघींचीही चौकशी सुरु केली आहे. ड्रग्स प्रकरणाशी श्रद्धाचा बाप शक्ती कपूरही वेगळ्या रुपाने जोडला गेला आहे. सुशांतच्या जीवनावर ‘न्याय- द जस्टिस’ (Nyay – The Justice) नावाचा एक चित्रपट तयार होत असून या चित्रपटात शक्ती कपूर नार्कोटिक्स ब्यूरोच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

चित्रपटाचा मुख्य अभिनेता झुबेर खान जो चित्रपटात सुशांतची भूमिका साकारीत असून त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव महेंद्र सिंह  (Mahendra Singh)आहे. चित्रपटाबाबत माहिती देताना झुबेरने सांगितले, चित्रपटात अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याची भूमिका साकारीत असून शक्ती कपूर नार्कोटिक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारीत आहे.

तर सुधा चंद्रन सीबीआय अधिकाऱ्याची (CBI Officer) भूमिका साकारीत आहे. नायिकेचे नाव उर्वशी ठेवण्यात आले असून ही भूमिका श्रेया शुक्ला साकारीत आहे. याशिवाय सारा अली खान, अंकिता लोखंडे आणि कृति सेननच्या भूमिकांसाठीही कलाकारांची निवड जवळ-जवळ पूर्ण झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून डिसेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

ही बातमी पण वाचा : विवेक ओबेरॉय लाँच करतोय श्वेता तिवारीच्या मुलीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER