अॅडल्ट स्टारच्या जीवनावरील शकीला लवकरच ओटीटीवर

Shakeela

साऊथची सेक्सी अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर तयार झालेल्या डर्टी पिक्चर (Dirty Picture) या चित्रपटात विद्या बालनने सिल्क स्मिताची भूमिका केली होती. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एक चित्रपट येत आहे. मात्र हा चित्रपट ओटीटीवर (OTT)येणार असल्याने त्याच्या यशाअपयशाबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. एका अॅडल्ट स्टारच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे नाव आहे शकीला. ओटीटीमुळे अनेक रखडलेले चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी निर्मात्यांना मिळू लागली आहे. त्यामुळेच शकीलासारखे रखडलेले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार झाला आहे.

इंद्रजीत लंकेश द्वारा दिग्दर्शित शकीलामध्ये रिचा चड्ढाने (Richa Chadha) शकीलाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत पंकज त्रिपाठीही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अनेक खळबळजनक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. जूनमध्येच तयार झालेला हा चित्रपट खरे तर चित्रपटगृहातच प्रदर्शित केला जाणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. पुढील वर्षी अनेक चित्रपटांची गर्दी होणार असल्याने निर्मात्याने हा चित्रपट ओटीटीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर चित्रपट प्रसारित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER