कोल्हापूर :शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळयानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळयानिमित्त महानगरपालिकेच्या शाळेतील व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने हा कार्यक्रम केशवराव भोसले नाटयगृह येथे आयोजीत करण्यात आला होता. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ महापौर सौ.सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते शाहु महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.

या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात दत्तबाळ इंग्लिश मेडियम यांनी सरस्वती वंदना करुन केली. यासह भाई माधवराव बागल प्रशाला कसबा बावडा शाळा यांनी पहिले नमन या गीतावर आली कला सादर केली. सेन्ट ऍ़न्थोनी स्कूल यांनी शुभ दिन आयोरे, जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयाने पाणी हरवले (भारुड), एम.एस.पटेल स्कूलने शाहू राजे थोर होते या शिर्षकाखाली विविध रुपातील पोषाक परिधार करुन गीतही सादर केले.

डॉ.दिपक साळुंखे प्राथमिक विद्यालयाने दार उघड ग बाई दार उघड, गणेश विद्यालयाने ए वतन ए वतन, नुतन मराठी विद्यालयोन जोगवा गीत, दत्ताबाळ प्राथमिक विद्यालयाने रणी फडकतो, माझी शाळा भोसलेवाडी यांनी लवाटी भंडारा, म.ल.ग. प्राथमिक शाळेने रंग दे बसंती, महापालिका बॅ.बाळासोा खर्डेकर विद्यामंदिर यांनी मराठमोळ गाणी, आण्णासोा शिंदे विद्यामंदिरने लख्ख पडला प्रकाश या गीतातून कला सादर केली. चाटे स्कूल संभाजीनगर यांनी से नो टु प्लॅस्टिक, महापालिका नेहरुनगर विद्यामंदिर यांनी इडा पिडा टळो या देखाव्यातून जनजागृती केली. पिन्स शिवाजी ताराराणी शाळेने शिवशाही हा देखावा सादर केला. दत्ताबाळ हायस्कूल (माध्यमिक) यांनी जोगवा गीतावर नृत्य सादर केले. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल यांनी लेझीम या पारंपारीक कलेचे सादरीकरण केले. कोल्हापूर पब्लिक स्कूल यांनी सेव्ह

वॉटर द्वारे पाणी बचतीचा नारा दिला.
यावेळी या सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या पहिल्या चार संघांना महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी रोख रक्कम जाहिर केली. प्रथम विजेत्या शाळेस रक्कम रु.5000/-, द्वितीय विजेल्या शाळेस रक्कम रु.3000/- व तृतीय आणि चौथा क्रमांक विजेल्या शाळेस रक्कम रु.1500/- व सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक महानगरपालिकेच्या नेहरुनगर विद्यामंदिर यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक प्रिन्स शिवाजी ताराराणी विद्यालय. तसेच तृतीय क्रमांक जिवन कल्याण प्राथमिक विद्यालय व चौथ्या क्रमांक दत्ताबाळ हायस्कुल यांना पटकाविला.