शाहू ब्लड बँक देणार पूरग्रस्तांना मोफत रक्त

Shahu Blood Bank

कोल्हापूर :- पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी झपाट्याने ओसरले आहे. आता मात्र साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे . अशा परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना रक्ताची गरज भासणेची शक्यता आहे. त्यासाठी शाहू ब्लड बँकेच्या वतीने मोफत रक्त देण्यात येणार आहे अशी माहिती ब्लड बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर आता साथीचे आजार होण्याचा धोका वाढला आहे . या स्थितीत रुग्णांना रक्ताची गरज भासणार आहे. पूरग्रस्त रुग्णांना वेळेत आणि मोफत रक्त मिळावे यासाठी शाहू ब्लड बँकेन पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट पासून रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्त संकलन करण्यात येणार आहे. संकलन झालेले रक्त कोणत्याही हॉस्पिटल मधील पूरग्रस्तांना, डॉक्टरांच्या शिफारशीनुसार मोफत देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व्ही बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिसिव्ही, एफएफपी, आणि आरडीपी प्रकारचे रक्त मोफत दिले जाणार असून, याव्यतिरीक्त लागणारे रक्त सवलतीच्या दरात देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावावा अस आवाहन ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी अमरसिंह माने बाबासाहेब पाटील बाबाभाई वसा राजेंद्र देशिंगे राजूभाई दोशी महेंद्र परमार आदी उपस्थित होते.