शाहरुख खानच्या चुलत बहिणीचे निधन; पाकिस्तानमध्ये होते वास्तव्य

Shahrukh Khan

मुंबई : ‘बॉलिवूड’ सुपरस्टार शाहरुख खानची चुलत बहीण नूरजहांचे पाकिस्तानातील पेशावर येथे कर्करोगाने निधन झाले. नूरजहांचा लहान भाऊ मंसूर अहमदने याबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे.

नूरजहां पाकिस्तानातील पेशावरच्या स्थानिक राजकारणात नगरसेवक म्हणून सक्रिय होती. शाहरुख खानला भेटण्यासाठी नूरजहां दोनदा भारतात आली होती. नूरजहां ही शाहरुख खानच्या वडिलांच्या चुलत भावाची मुलगी आहे. लहानपणी शाहरुख खानही आई-वडिलांसोबत पेशावरमध्ये आपल्या नातेवाइकांना भेटायला गेला होता.