शाहनवाज हुसैन जाणार विधानपरिषदेत

Shahnawaz-Hussain

दिल्ली :  भाजपाने माजी केंद्रीयमंत्री शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain ) यांना बिहारमध्ये विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांनी आज (शनिवारी)उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेवदवारांची नावे निश्चित केली आहेत.

बिहारमध्ये दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. या दोन्ही जागा भाजपाच्या कोट्यातीलच आहेत. ज्यामधील एक सुशील मोदी यांची राज्यसभेवर गेल्याने, रिकामी झाली आहे.तर, दुसरी जागा विनोद कुमार झा आमदार झाल्याने रिक्त झाली आहे. राज्यातील आमदारांची संख्या पाहता २८ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला एक जागा गमावावी लागण्याची शक्यता आहे. ज्याचा फायदा विरोधी पक्षास होणार आहे.

बिहारमधील विधानपरिषदेच्या दोन जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ जानेवारीपर्यंत चालेल. विनोद नारायण झा यांच्या रिक्त होणाऱ्या जागेचा कार्यकाळ २१ जुलै २०२२ पर्यंत आहे. तर सुशील कुमार मोदी यांच्या जागेचा कार्यकाळ ६ मे २०२४ पर्यंत आहे.

तर, उत्तर प्रदेशात विधानपरिषदेच्या १२ जागांवर निवडणूक होणार आहे. भाजपाकडून कुंवर मानवेंद्र सिंह, गोविंद नारायण शुक्ला, सलील बिश्नोई, अश्विनी त्यागी, धर्मवीर प्रजापती आणि सुरेंद्र चौधरी ही सहा उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

२८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी आहे. या विधानपरिषद निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला ९ जागा येण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या वाट्याला एक जागा येऊ शकते. काँग्रेस आणि बसपाच्या वाट्याला एकही जागा येणार नसल्याचाही अंदाज वर्तवला जातो आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीअगोदर ही निवडणूक महत्वाची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER