शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे स्वप्न करणार : ना. मुश्रीफ

Mushrif

कोल्हापूर : निगवे खालसा ता. करवीर येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशी आदरांजली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाहिली. मंत्री मुश्रीफ यांनी निगवे खालसा गावाला भेट दिली. दरम्यान शहीद जवान पाटील यांच्या घरी त्यांच्या हौतात्म्यांची माहिती अजून ग्रामस्थांनी दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे ना. मुश्रीफ यांनी अंत्यसंस्कार होणार असलेल्या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांकडे विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, शहीद संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि हिंम्मत कुटुंबीयांना द्यावी, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. या परिवाराच्या पाठीशी हिमालयासारखे उभारणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. कुटुंबीयांच्या व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील स्वीकारतीलच. शहीद जवान संग्राम पाटील यांचे घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांचे हे अपुले स्वप्न मी मुश्रीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करेन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER