शाहीदने नकार दिला करण जोहरच्या ‘योद्धा’ला

shahid

प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) सिनेमात काम करण्यास ए ग्रेड कलाकारापासून सगळे एका पायावर तयार असतात. धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम मिळणे म्हणजे पुढील काही काळाची सोय होते. काही सिनेमे हाती पडतात असे कलाकारांना वाटत असते. करणची अशी इमेज असताना त्याचा सिनेमा कोणी नाकारेल असे वाटत नाही. परंतु अभिनेता शाहीद कपूरने (Shahid Kapoor) या गोष्टीला छेद दिला असून त्याने चक्क करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा सिनेमा स्क्रिप्टमुळे नाकारल्याचे सांगितले जात आहे.

शाहिद कपूर सध्या साऊथच्या सिनेमाची रिमेक असलेल्या ‘जर्सी; या क्रिकेटवर आधारित सिनेमाचे शूटिंग करीत आहे. गेल्या काही काळापासून शाहिद कपूर आमिरप्रमाणे अत्यंत चूझी झाला असून प्रत्येक सिनेमा तो विचार करून आणि सगळी माहिती घेऊन निवडतो. काही दिवसांपूर्वी शाहिदने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनदवारा निर्मित आणि शशांक खेतान दिग्दर्शित ‘योद्धा’ सिनेमात काम करण्यास होकार दिला होता. परंतु आता शाहिदने हा सिनेमा सोडल्याचे सांगितेल जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी सुरु केले जाणार होते. शूटिंग सुरु करण्यापूर्वी शाहिदने दिग्दर्शकाबरोबर सीटिंग केले आणि कथेवर चर्चा केली. मात्र कथेतील काही सीन शाहिदला आवडले नाहीत आणि कथाही त्याला बरोबर वाटली नाही. त्याने कथेत बदल करण्याची सूचना दिग्दर्शकाला केली. दिगदर्शक शशांकने ही गोष्ट करणला सांगितली. मात्र कथेत बदल केला जाणार नाही असे सांगितल्यानंतर शाहिदने सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला आणि सिनेमा सोडला.

खरे तर शूटिंगची सगळी तयारी करण्यात आली होती आणि स्वतः करण जोहर या सिनेमाची घोषणा करणार होता. परंतु आता शाहिदने सिनेमा सोडल्याने करण जोहरला नवा ‘योद्धा’ शोधावा लागणार आहे. शाहिदने या सिनेमासाठी दिलेल्या डेट्स आता तो प्रथमच करीत असलेल्या वेबसीरीजसाठी दिल्याचे सांगितले जात आहे. अन्य मोठ्या कलाकारांप्रमाणे शाहिदही वेबसीरीजमध्ये दिसणार असून यात तो साउथ स्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. राज आणि डीके ही जोड़ी दिग्दर्शन करीत असलेल्या या वेबसीरीजचे शूटिंग मुंबई आणि गोव्यात केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER