शाहिद कपूरही येणार ओटीटीवर

शाहिद कपूरला (Shahid Kapoor) साऊथच्या सिनेमांनी चांगलाच हात दिलेला आहे. साऊथच्या ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy) सिनेमावर आधारित ‘कबीर सिंह’ सिनेमा शाहिदने केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यानंतर शाहिदने साऊथच्याच ‘जर्सी’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास होकार दिला. रिमेकमध्येही सिनेमाचे नाव ‘जर्सी’च ठेवण्यात आले आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंगच होऊ शकले नव्हते. शूटिंगला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर शाहिदने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हा सिनेमा यावर्षी 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमात बिझी असतानाच आता शाहिदने ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीसाठी एक वेबसीरीज तयार करण्यात येणार असून या वेबसीरीजबाबत शाहिदने सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली आहे. या वेबसीरीजचे नाव अजून ठेवण्यात आलेले नाही.

शाहिदच्या या वेबसीरीजमध्ये त्याची नायिका म्हणून काम करण्यासाठी राशी खन्नाची निवड करण्यात आलेली आहे. राशी साऊथची सुपरहिट नायिका आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन राज आणि डीके हे दोघे मिळून करीत आहेत. शाहिदने या वेबसीरीजबाबत इन्स्टाग्राम अकाउंटवर माहिती दिली आहे. शाहिदने एक फोटो शेअर केला असून यात तो दिग्दर्शक राज आणि डीकेसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोसोबत शाहिदने त्याच्या नव्या वेबसीरीजबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री राशी खन्नानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शाहिदसोबतचा विशेष फोटो शेअर केला आहे. राशीचा हा फोटोही शाहिदने त्याच्या अकाउंटरवर शेअर केला असून ‘बोर्डावर स्वागत तुझ्या सेल्फीचा भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. असे लिहिले आहे. शाहिदचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER