राज आणि डीके यांच्या नवीन वेबसीरीजमधून शाहिद कपूर करणार डिजिटल डेब्यू

ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार आपली कला सादर करताना दिसले होते, दिसत आहेत आणि यापुढेही दिसणार आहेत. अगदी अमिताभ बच्चनपासून अभिषेक बच्चन आणि सैफ अली, सुष्मिता सेनपर्यंत अनेक कलाकार आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसले आहेत. या यादीत शाहीद कपूरचा समावेश होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला दिलीच होती. आम्ही दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले असून अमेझॉनने गुरुवारी शाहीद कपूर (Shahid Kapoor) बरोबच्या वेबसीरीजची घोषणा केली आहे.

राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी काही महिन्यांपूर्वी ‘द फॅमिली मॅन’ ही वेबसीरीज अमेझॉनवर सादर केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीने यात मुख्य भूमिका साकारली होती. ही वेबसीरीज प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता हे दोघे एक अत्यंत वेगळी थ्रिलर वेबसीरीज प्रेक्षकांसमोर घेऊन येत असून यात शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सीता. आर. मेनन, सुमन कुमार आणि हुसेन दलाल यांनी या वेबसीरीजचे लेखन केले आहे.

शाहीद कपूरने वेबसीरीजबाबत बोलताना सांगितले, “राज आणि डीकेसोबत काम करण्याची माजी मनापासून इच्छा होती. डिजिटल एंट्री करण्यासाठी मला त्यांच्याइतके योग्य दुसरे कोणीही वाटले नाही. त्या दोघांनी मला जेव्हा या वेबसीरीजची कथा ऐकली तेव्हाच ती मला आवडली आणि मी लगेचच होकार दिला. आमची वेबसीरीज प्रेक्षकांसमोर आणताना मला खूप आनंद होत. आहे.”

राज आणि डीके यांनी सांगितले, या वेबसीरीज संहिता आमची अत्यंत आवडती आहे. या संहितेसाठी आम्हाला शाहीद परिपूर्ण वाटला त्यामुळेच तोच सुरुवातीपासूनच आमच्या डोळ्यासमोर होता. आम्ही त्याच्याशी संपर्क साधून वेबसीरीजबाबत चर्चा केली आणि त्यानेही कथा ऐकताच लगेच होकार दिला.

या वेबसीरीजबाबत बोलताना अमेझॉन प्राईम व्हिडियोच्या भारतातील कंटेंट विभागाचे मुख्य संचालक विजय सुब्रमण्यम यांनी सांगितले, “भारतासह जगभरातील नामवंत कथाकारांना आम्ही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतो याचा आम्हाला अभिमान आहे. शाहीद कपूर हा सर्वगुणसंपन्न कलाकार आहे, राज व डीके यांच्या निर्मितीतून साकारलेल्या नाविन्यपूर्ण कलाकृतीद्वारे तो आमच्या कुटुंबाचा एक भाग होतोय याचा आंम्हाला आनंद आहे. ही वेबसीरीज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

वेबसीरीजमधील अन्य कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER