शाहिद कपूरने ‘जर्सी’ चित्रपटासाठी इतक्या रुपयांनी केली फी कमी, जाणून घ्या कारण काय आहे

Jersey movie-Shahid Kapoor.jpg

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आपल्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटासाठी (Jersey movie) फी कमी करणार आहे. कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) चित्रपटांचे शूटिंग बर्‍याच दिवसांपासून थांबले होते. आता हळू हळू शूटिंग सुरू होत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चित्रपट निर्माते शूटिंगसाठी जास्त खर्च करत आहेत. अशा परिस्थितीत शाहिद कपूरने ‘जर्सी’ या चित्रपटासाठी फी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाहिद कपूर ‘जर्सी’ साठी ३३ कोटी रुपये घेणार होता आणि चित्रपटाच्या नफ्यात शेअर घेणार होता. तथापि, आता त्याने ते कमी केले आहे. आता शाहिद कपूर ३३ कोटी ऐवजी केवळ २५ कोटी घेईल. तथापि, नफ्याच्या वाटणीबाबत पूर्वीच्या करारामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

‘जर्सी’ या चित्रपटात शाहिद कपूरची नायिका मृणाल ठाकूर असणार आहे. दोन्ही स्टार्स लवकरच देहरादून आणि चंदीगडमध्ये शूट करणार आहेत. हा साऊथचा सुपरहिट चित्रपट जर्सीचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केले आहे.

विशेष म्हणजे शाहिद कपूर अखेर कबीर सिंह चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करू केली. त्याचे दिग्दर्शन संदीपसिंग वांगा यांनी केले होते. हा चित्रपट गेल्या वर्षी २१ जुन रोजी प्रदर्शित झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER