शाहीद कपूरने केली फीमध्ये कपात

Shahid Kapoor

कोरोनाचा (Corona) संसर्ग सुरु झाल्यानंतर संपूर्ण देश लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला. त्यामुळे बॉलिवूडमधील (Bollywood) सगळेच काम थांबले. अनेक चित्रपटांचे शूटिंगही लांबणीवर टाकावे लागले, तर तयार झालेल्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलले. तर काही चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा रस्ता पकडला. मात्र आता सात महिन्यानंतर पुन्हा एकदा लाईट्स कॅमरा अॅक्शनला सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे बजेट कमी केले. तसेच कलाकार आणि तंत्रज्ञांनीही चित्रपटसृष्टीवरील संकट पाहाता आपले मानधन कमी केले. त्याचाच कित्ता बॉलिवूडमध्ये शाहीद कपूरनेही (Shahid Kapoor) गिरवला आहे.

आपल्या जर्सी चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे. चित्रपटाचे शूटिंग आता शेवटच्या टप्प्यात आहे. निर्मात्याची अडचण लक्षात घेऊन शाहिदने त्याची फी कमी करून निर्मात्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटासाठी शाहिदला 33 कोटी रुपये मानधन आणि चित्रपटाच्या नफ्यात वाटा देण्याचे मान्य करण्यात आले होेते. शाहिदने त्याच्या फीमध्ये आठ कोटी रुपयांची कपात करून निर्मात्याला सुखद धक्का दिला. मात्र नफ्यातील आपला हिस्सा कायम ठेवला आहे. चित्रपट सुपरहिट होईल याची खात्री असल्याने निर्मात्यानेही शाहिदची नफ्यातील हिश्शयाची अट कायम ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER