
बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाचे दुबईमध्ये शूटिंग करत आहे. त्याच वेळी पठाण चित्रपटाच्या सेट वरून काही फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर लीक झाले आहेत. शाहरुख बऱ्याच दिवसांपर्यंत कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. शाहरुखच्या पुनरागमनाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, शाहरुखच्या आगामी चित्रपटाचे काही सीन लीक झाले आहे आणि ते इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.
या चित्रपटाच्या शूटिंगसाठी या चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा फोटो लीक होऊ नये म्हणून सेटवर इतकी सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे की तसे घडू नये. चित्रपटाचे काही सीन लीक झाले आहेत. ज्यामध्ये शाहरुख एका फिरत्या वाहनाच्या छतावर बसलेला दिसला. चाहते अंदाज लावत आहे की तो अॅक्शन सीनसाठी शूट करत आहे.
चित्रपटाशी संबंधित कन्टेन्ट इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर आता चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तथापि, सोशल मीडियावरून हे दृश्य काढून टाकण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. पण हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लवकरच जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणही दुबईमध्ये शूटिंगसाठी सामील होतील.
शाहरुखच्या फॅन क्लबनेही दुबई शूटिंगच्या वेळापत्रकांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाहरुख एका फॅनसह फोटोसाठी पोज देतानाही दिसला. ‘पठाण’ चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात शूटिंग सुरू आहे, हे इंटरनेटवरील या फोटोंमध्ये आणि व्हिडिओमध्ये पाहता येईल.
शाहरुख खान आदित्य चोपडाच्या (Aditya Chopra) यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे कमबॅक करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत. ‘पठाण’ मध्ये दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. शाहरूख आणि दीपिका रॉ एजंट्सच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया या एजन्सीच्या लीडरच्या भूमिकेत दिसतील. जॉन या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
Team Pathan with the camera guys reached UAE yesterday, they have started shooting plates at 4am in downtown, Dubai.
Some more snaps of the King @iamsrk from #Pathan shooting place…
Enjoy guys… ❤️🔥👑 pic.twitter.com/GhlxlJXxhV— 💕Deb The King Of Hearts💕 (@I_AM_DEBESH) January 27, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला