आमिरच्या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार शाहरुख खान

Shahrukh Khan - Aamir Khan

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणमध्ये (Pathan) पाहुण्या कलाकाराची भूमिका करण्यास सलमान खान (Salman Khan) तयार झाला. आता शाहरुख खान आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा चित्रपटात पाहुण्या कलाकारीच भूमिका साकारणार असल्याचे समजते. या तिघांना एकत्र एका चित्रपटात पाहाण्याची त्यांच्या प्रशंसकांची इच्छा आहे. परंतु हा योग अजून आलेला नाही. मात्र सलमानने शाहरुखसोबतही काम केले आहे आणि सलमानसोबतही. सलमानबरोबर आमिरने चित्रपट केला असला तरी शाहरुख खानसोबत आजवर कधीही काम केलेले नाही. आता प्रथमच हे दोघे एका फ्रेममध्ये दिसणार आहेत.

आमिर खान सध्या दिल्लीत त्याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. काही दिवसांपूर्वीच करीनाने तिचे काम पूर्ण केले आहे. आमिर खान आता उर्वरित काही दृश्यांचे शूटिंग दिल्लीत करीत आहे. दिल्लीच्या सेटवर शाहरुख खान नुकताच पोहोचला आणि त्याने शूटिंग केल्याचे सांगितले जात आहे.

खरे तर शाहरुख खान यूएईमध्ये आयपीएलच्या मॅचेससाठी गेला होता. मात्र त्याची टीम केकेआर स्पर्धेतून बाहेर फेकली गेल्याने शाहरुख भारतात परतला. आमिर खानच्या लाल सिंह चड्ढाच्या स्पेशल इफेक्ट्सचे काम शाहरुखची कंपनीच करीत आहे. एकदा बोलताना आमिरने शाहरुखला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेबाबत विचारले असता शाहरुख त्यासाठी लगेचच तयार झाला होता. त्यामुळेच यूएईमधून मुंबईत आल्याबरोबर शाहरुख दिल्लीला गेला आणि त्याने शूटिंग केल्याचे सांगितले जात आहे. मात्र शाहरुखची भूमिका काय आहे त्याबाबत मात्र चुप्पी साधली गेली आहे. हॉलिवूडच्या सुपरहिट ‘फॉरेस्ट गम्प’ चित्रपटाची आमिर खान रिमेक करीत असून पुढील वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER