शाहरुख खान बॉबी देओलला घेऊन तयार करणार ‘लव्ह हॉस्टेल’

Shah Rukh Khan and Bobby Deol.jpg

बॉबी देओलची (Bobby Deol) सेकंड इनिंग खूपच चांगल्या प्रकारे सुरु झालेली आहे. ‘क्लास ऑफ 83’ ने ओटीटीवर चांगले यश मिळवले. तसेच बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम वेब सीरीजनेही प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. प्रेक्षकांना मिळालेल्या प्रतिसादामुळे याचा दुसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओलकडे आता अनेक निर्मात्यांचे लक्ष जाऊ लागले आहे. शाहरुख खानही (Shah Rukh Khan) बॉबी देओलच्या अभिनयाने प्रभावित झालेला असून त्याच्या रेड चिलीद्वारे निर्मित लव्ह हॉस्टेलसाठी त्याने बॉबी देओलला साईन केले आहे.

हा चित्रपट एक प्रेमकथा असून प्रेमी जोडप्याच्या मागे कोणती संकटे येतात आणि त्यातून त्यांना कोण आणि का वाचवते अशी या चित्रपटाची कथा असून यात सस्पेंसही आहे. चित्रपटाचे दिग्दर्सन रमण शंकर करीत आहे. रमणने या चित्रपटाबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. रमणने पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रश्न कोणताही असो त्याचे उत्तर हिंसा असू शकत नाही या सूत्रावर आधारित हा चित्रपट असून मला विक्रांत मैसी, सान्या मल्होत्रा आणि बॉबी देओल हे परफेक्ट कलाकार मिळाले आहेत. हे कलाकार मिळाल्याने मला आनंद झाला असून यांच्यामुळेच हा चित्रपट समाज कसा बनला आहे ते प्रखरपणे दाखवता येणार आहे.

लव्ह हॉस्टेल चित्रपटाची निर्मिती निर्माण गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा करीत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट सेटवर जाणार असून पुढील वर्षीच चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER