शाहरुख खान आता बाप बेट्यांच्या भूमिकेत

Shah Rukh Khan to play a dual role.jpg

शाहरुख खानला (Shah Rukh Khan) दुहेरी भूमिका साकारण्याची खूप आवड आहे. त्यातही एक भूमिका नकारात्मक असावी असाही त्याचा आग्रह असतो. अगदी महेश भट्टच्या ‘डुप्लिकेट’पासून ‘फॅन’पर्यंत त्याने अशा भूमिका साकारलेल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून अपयशाच्या गर्तेत सापडलेला शाहरुख आता पुन्हा एकदा आपल्या कारकिर्दीला सुरुवात करताना दुहेरी भूमिका साकारणार आहे. दोन वर्षानंतर शाहरुख पुन्हा मैदानात उतरत असून त्याने तीन चित्रपट साईन केलेले आहेत. त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत आम्ही तुम्हाला सांगितलेले होतेच. ‘पठाण’सोबतच शाहरुखने राजकुमार हिरानी यांच्याही चित्रपटाला सुरुवात करण्यास होकार दिला असून दक्षिणेतील प्रख्यात दिग्दर्शक अॅटलीबरोबरही एक चित्रपट करणार असून या चित्रपटात तो बाप आणि मुलाची दुहेरी भूमिका साकारणार आहे.

दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, जीतेंद्र इत्यादी कलाकारांनी आपली दुसरी इनिंग सुरु करताना अशा प्रकारे पिता-पुत्राची दुहेरी भूमिका साकारली होती. आणि त्यांचे चित्रपट हिटही झाले होते. शाहरुखही आता याच मार्गावरून जाणार आहे. अॅक्शन ड्रामा असलेल्या या चित्रपटात पिता शाहरुख पोलीस प्रमुखाची भूमिका साकारणार आहे. तर मुलगा झालेला शाहरुख गुन्हेगार असून पिता-पुत्रांमधील पकडापकडीचा खेळ या चित्रपटात रंगवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 2021 च्या शेवटी प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER