दुसऱ्यांनी सोडलेले चित्रपट करून शाहरुख झाला स्टार

Sharukh Khan

शाहरुख खानचे (Sharukh Khan) नशीब खरोखरच चांगले म्हणायला पाहिजे. पहिल्या चित्रपटापासून ते दिलवाले दुल्हनियां ले जाएंगेपर्यंत त्याने जे यशस्वी चित्रपट केले ते कोणी ना कोणी सोडले होते आणि त्यानंतर त्या चित्रपटात शाहरुखची वर्णी लागली होती. विशेष म्हणजे दुसऱ्यांनी सोडलेल्या भूमिका शाहरुखने केल्या आणि ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारे ठरले. अशाच चित्रपटांवर एक नजर

शाहरुख खानचा पहिला यशस्वी चित्रपट म्हणजे ‘दीवाना’. परंतु या चित्रपटात तो नायकाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हता. ऋषी कपूर, दिव्या भारती आणि शाहरुख अभिनीत या चित्रपटात शाहरुखची भूमिका सर्वप्रथम अरमान कोहलीला देण्यात आली होती. अरमान कोहलीने चित्रपटाचे काही शूटिंग, एक गाणेही चित्रित केले होते. परंतु काही कारणाने अरमानने हा चित्रपट सोडला आणि शाहरुखची चित्रपटात एंट्री झाली. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि शाहरुखची घोडदौड सुरु झाली.

याचप्रमाणे 1993 मध्ये जेव्हा दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ‘बाजीगर’ची योजना आखली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नायक म्हणून सलमान खानचेच नाव होते. सलमान खानशी दिग्दर्श्क द्वयीची चर्चा झाली. सलमानने संपूर्ण कथानक ऐकले परंतु चित्रपटात आपल्याला नायक म्हणून नव्हे तर खलनायक म्हणून काम करायचे आहे आणि शेवटी मरायचे आहे हे दिसल्यावर सलमानने चित्रपटाला नकारच देऊन टाकला. कोणत्याही चित्रपटात शेवटी मरण्याची भूमिका कधीही न करण्याचा निर्णय सलमान खानने घेतला होता आणि आजही तो आपल्या या निर्णयावर कायम आहे. सलमानने नकार देतानाच या भूमिकेसाठी शाहरुखला घ्या असा सल्ला अब्बास-मस्तानला दिला. अब्बास-मस्तानने शाहरुखला बाजीगर बनवले. शिल्पा शेट्टी आणि काजोल अशा दोन नायिका शाहरुखला या चित्रपटात मिळाल्या होत्या. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला गोळा केला होता.

ही बातमी पण वाचा : जेव्हा शाहरुखच्या कानाखाली वाजवायची होती जया बच्चन यांना

2000 मध्ये मंसूर खान यांनी जेव्हा ‘जोश’ चित्रपटाला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम  नायक म्हणून आपला चुलत भाऊ आमिर खानला घेण्याचे ठरवले होते. परंतु आमिर खान दुसऱ्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्याने नकार दिला. त्यानंतर मंसूर खानने सलमान खानला विचारले. परंतु ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका करावयाची असल्याने सलमाननेही चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर मंसूर खानने शाहरुख खानला मॅक्स बनवले आणि जोशची निर्मिती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा यशस्वी ठरला नाही पण शाहरुख खानची मॅक्सची भूमिका सगळ्यांनाच आवडली होती.

2007 मध्ये कबीर खानने जेव्हा चक दे इंडियाची योजना आखली तेव्हा हॉकी कोच म्हणून  सलमान खानचीच निवड करण्यात आली होती. परंतु सलमानकडे डेट्स नसल्याने त्याने हा चित्रपट नाकारला. त्यानंतर कबीर खानने शाहरुखला विचारले. चित्रपटाची कथा ऐकताच शाहरुखने लगेचच होकार दिला. शाहरुखच्या करिअरमधील हा एक चांगला चित्रपट मानला जातो.

ज्या चित्रपटाने सगळ्यात जास्त काळ चित्रपटगृहात मुक्काम ठोकल्याचा विक्रम केला तो चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. आदित्य चोप्रा यांनी जेव्हा या चित्रपटाला सुरुवात केली तेव्हा राजच्या भूमिकेसाठी सैफ अली खानला घेण्याचा निर्णय केला होता. राजची भूमिका एका साध्या, सरळ प्रेमवीराची होता. त्यामुळे सैफ या भूमिकेसाठी त्यांना योग्य वाटला होता. परंतु काही कारणामुळे सैफने चित्रपट नाकारला. त्यानंतर यश चोप्रा यांनी शाहरुखला विचारले आणि शाहरुखच्या नावावर एका विक्रमी चित्रपटाची नोंद झाली.

सलमान खान आणि शाहरुख खान यांनी प्रथमच एकत्र येत ‘करण अर्जुन’ चित्रपट केला. राकेश रोशन द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. परंतु राकेश रोशनने जेव्हा या चित्रपटाची योजना आखली तेव्हा यात सलमान, शाहरुख नव्हते तर सनी देओल आणि बॉबी देओल या बंधुंना घेण्याचे ठरवण्यात आले होते. बॉबी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार असल्याने सनी देओल कोणतीही रिस्क घेण्यास तयार नव्हता त्यामुळे त्याने हा चित्रपट नाकारला आणि त्यांच्या जागी सलमान, शाहरुख आले.

शाहरुखच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड म्हणजे आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आशुतोषने सर्वप्रथम ऋतिक रोशनला विचारले होते. परंतु ऋतिकने चित्रपटाला नकार दिल्याने आशुतोषने शाहरुखला विचारले. वेगळा चित्रपट असल्याने शाहरुखने होकार दिला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही पण शाहरुखला वेगळा चित्रपट केल्याचे समाधान मात्र मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER