शहा-पवार भेट : ‘आगे आगे देखो, होता हैं क्या !’ भाजपच्या बड्या नेत्याने सस्पेन्स वाढवला

Amit Shah - Sharad Pawar - Ram Shinde - Maharashtra Today

पंढरपूर : महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) शिल्पकार आणि दिशादर्शक असलेले शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप (BJP) नेते अमित शहा (Amit Shah) यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत आता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी सूचक विधान करून सस्पेन्स आणखीनच वाढवला आहे.

राम शिंदे यांनी मंगळवारी पंढरपुरात संवाद साधला. त्यांना अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता हैं क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. या निवडणुकीसाठी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज भाजपचे राज्यातील बडे नेते पंढरपुरात येणार आहेत. पंढरपूरची पोटनिवडणूक म्हणजे ठाकरे सरकारसाठी लिटमस टेस्ट असेल, असे विधान राम शिंदे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button