कोरोना मृत्युछाया : महिलेने केली अंत्यसंस्काराची रंगीत तालीम !

Woman Funeral Chile

चिली :- कोरोनामुळे (Corona) सध्या जगभर मृत्यूचे सावट आहे. काही माणसांना हा ताण सहन होत नाही. आपले काय होणार, यामुळे भयभीत आहेत. चिलीमधील सँटियागो शहरात राहणारी मायरा अलोंजो (५९) ही महिला अशांपैकी एक. कोरोनाने माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या अंत्यसंकराचे काय होईल, याची तिला काळजी होती म्हणून तिने तिच्या अंत्यसंस्काराची रंगीत तालीम केली. विशेष म्हणजे तिला मानसिक समाधान मिळाले. ती म्हणाली, आता मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची गरज नाही; मी सर्व पाहिले आहे!

मायरा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांनी अस्वस्थ झाली होती. माझाही असाच मृत्यू झाला तर… या विचारात तिला अंत्यसंस्काराची रंगीत तालीम करण्याची कल्पना सुचली. तिने नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना याबद्दल सांगितले. सर्वांच्या संमतीने कार्यक्रम ठरला!

मायराचे नातेवाईक – मित्र जमलेत. तिला शवपेटीत ठेवले. सर्व विधी आटोपेपर्यंत मायरा शवपेटीत निश्चल पडून होती. हजर असलेल्या तिच्या नातेवाइकांनी आणि मित्रांनी तिच्यासाठी शोक केला. काहींनी फोटोही काढून घेतले. मायराने पांढरा ड्रेस घातला होता. तिच्या नाकात कापसाचे बोळे घातले होते. अंत्यविधीचे सर्व विधी करण्यात आले. यासाठी ७१० पाउंड्स (सुमारे ७५ हजार रुपये) खर्च झालेत. पण मायराचे पूर्ण समाधान झाले.

याबद्दल मायरा म्हणाली की, आता मृत्यूनंतर कोणत्याही अंत्यसंस्काराची गरज नाही. कारण जिवंतपणीच मी सर्व पाहिले आहे. कोरोनामुळे ज्या प्रकारे लोकांचा मृत्यू होतो आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतला.

काही लोकांनी मायराच्या या कृतीवर टीका केली. म्हणालेत, मायरा असे करून कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची थट्टा करते आहे, हे चूक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button