महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी ‘मनसे’ राबवणार शॅडो कॅबीनेट

Shadow Cabinet will launch MNS

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आजपासून एक नवी सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या झेंडयाप्रमाणेच मनसे नवी दिशा ठरवत असल्याचे दिसते. इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात ‘शॅडो कॅबिनेट’ची संकल्पना राबवण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसे शॅडो कॅबीनेट राबवणार आहे. या कॅबीनेट मार्फत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वचक ठेवण्यात येईल. त्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.

मनसेच्या महाअधिवेशनात दुपारच्या सत्रात शॅडो कॅबिनेटची घोषणाहोईल. मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. मनसे नेते शिरीष सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा मनसे नेते पाठपुरावा करतील. हे सर्व नेते पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड देतील.

संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शालिनी ठाकरे, जयप्रकाश बाविस्कर, संतोष धुरी, यशवंत किल्लेदार, अनिल शिदोरे यासारख्या बड्या नेत्यांचा शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश असेल. मनसेच्या कोणत्या नेत्याकडे कोणत्या मंत्र्याची जबाबदारी असेल, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

शॅडो कॅबिनेट म्हणजे ?

सरकारमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व असते. पर्यायी पक्ष म्हणून तोच अधिकारावर येण्याची शक्यता असते. विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली.

कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे 15 ते 20 मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र 33 मंत्र्यांचा समावेश आहे.

मनसेच्या मंचावर अमित ठाकरे, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार