शबाना आझमींची प्रेमकथा : वडिलांनी नकार देऊनही विवाहित पुरुषाशी केले लग्न

Javed Akhtar - Shabana Azmi

बॉलिवूडची (Bollywood) ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) आज १८ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या वर्षी शबाना ७० वर्षांच्या होतील. शबाना आझमी ह्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांनी ग्लॅमरशिवाय वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांना पहिल्यांदा १९७५ मध्ये ‘अंकुर’, १९८३ मध्ये ‘अर्थ’, १९८४ मध्ये ‘खंडहर’, १९८५ मध्ये ‘पार’ आणि १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले होते. शबाना यांच्या वाढदिवशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या …

शबाना आझमीला ओळख त्यांच्या अभिनयाने मिळाली आहे. त्यापेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याने त्या चर्चेत राहिल्या आहेत. जावेद अख्तर यांच्याशी लग्नानंतर शबाना यांचे नाव चित्रपट निर्माते शेखर कपूरबरोबरही जोडले गेले होते. तथापि, नंतर ही अफवा सिद्ध झाली. जावेद आणि शबाना यांची लव्ह स्टोरी एक चित्रपट आहे. जावेद अख्तर यांच्याशी जवळीक असल्यामुळे शबाना यांना घरात विरोधाचा सामना करावा लागला. जावेदशी लग्न करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते.

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे पहिले लग्न हनी इराणीशी झाले होते. हनी ही जावेदपेक्षा १० वर्षांनी लहान होती. त्यांना झोया आणि फरहान ही दोन मुले आहेत. जावेद अख्तर हे १९७० साली शबाना आझमींचे वडील कैफी आझमी यांच्याकडून लेखनकला शिकत होते. या काळात जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यात जवळीक वाढली. दोघांच्या अफेअरची बातमीही माध्यमांना मिळाली.

शबानामुळे दररोज जावेद आणि हनी यांच्यामध्ये वाद सुरू असायचे. मुलांमुळे जावेद यांना हनीला सोडायचे नव्हते. असं म्हणतात की, घरात दररोज भांडण होत असताना पाहून हनीने जावेद यांना शबानाजवळ जाण्याची परवानगी दिली. हनीने जावेद यांना म्हटले, तुम्ही शबानाजवळ जा आणि मुलांची चिंता करू नका. त्यानंतर जावेद यांनी हनीशी घटस्फोट घेतला.

जावेद अख्तर लग्नासाठी तयार असताना शबाना यांचे वडील खूश नव्हते. कैफी आझमींना वाटले की, शबानामुळे जावेद आणि हनीमध्ये वाद निर्माण झाला आहे. तसेच, शबानाने विवाहित पुरुषाशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. जावेद अख्तरचे लग्न माझ्यामुळे मोडले नाही याची शबाना यांनी वडिलांना खात्री पटवून दिली. मग कैफी साहब यांनी त्यांच्या लग्नास सहमती दर्शविली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER