
शबाना आझमी (Shabana Azmi) एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये काम करीत असून त्यांना दोन दिवसांपूर्वी शूटिंगसाठी लंडनला जायचे होते. पण लंडनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने भारत आणि लंडनदरम्यानच्या सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या. त्यामुळेच शबाना आझमी लंडनला शूटिंगला जाऊ शकत नव्हत्या. त्यांनी तसे निर्मात्याला कळवलेही होते. परंतु आपल्यामुळे निर्मात्याला त्रास होऊ नये असेही त्यांना वाटत होते. यामुळेच त्यांनी यातून मार्ग काढला आणि त्या लंडनला पोहोचल्या.
शबाना आझमी लंडनला पोहोचल्या असून त्यांनी आपल्या या प्रवासाबाबत माहिती देताना सांगितले, मला वाटलेच नव्हते की मी लंडनला पोहोचू शकेन. ज्या दिवशी मला शूटिंगसाठी लंडनला जायचे होते त्या दिवशी एकही फ्लाईट लंडनसाठी नव्हती. कोरोनामुळे भारत-लंडनदरम्यानच्या फ्लाईट रद्द करण्यात आल्या होत्या. लंडनला जाण्याचा कोणताही मार्ग मला उपलब्ध नव्हता. मला खात्री होती की मला माझे शूटिंग रद्द करावे लागेल. मात्र मी यातून मार्ग काढण्याचे ठरवले. भारत ते दुबई अशा फ्लाईट आहेत. मग मी दुबई लंडन फ्लाईट आहे का याची माहिती घेतली. तेव्हा दुबईवरून लंडनसाठी फ्लाईट असल्याचे मला समजले. मी लगेचच दिल्ली- दुबईचे तिकीट काढले आणि दुबईला पोहोचले. दुबईहून मी लंडनचे फ्लाईट घेतले आणि लंडनमध्ये पोहोचले. दुबईत माझ्या सर्व कोविड चाचण्या पुन्हा कराव्या लागल्या. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला दुबई ते लंडन प्रवासाची परवानगी देण्यात आली. सर्वांना आशा होती की २०२१ पूर्वीच्या गोष्टी पुन्हा दिसतील. पण कोरोनाची साथ वाढतच आहे. सर्व सुरळीत होण्यासाठी अजून खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे कोविड मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिशय कठीण परिस्थितीत काम करावे लागणार आहे. दुसरा कोणताही पर्याय नाही. असेही शबाना आझमी यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला