सायन रुग्णालयात झोपलेल्या मुलासोबत लैंगिक चाळे

mumbai today

मुंबई : सायन रुग्णालय इमारतीतील मोकळ्या पॅसेजमध्ये झोपलेल्या 12 वर्षीय मुलासोबत एका 50 वर्षीय मुलाने तब्बल चार तास लैंगिक चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झाकीर अन्सारी असे आरोपी नराधमाचे नाव असून सायन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : आईने मुलीचा बालविवाह करत ढ़कलले वेश्याव्यवसायात …

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील वार्ड क्रमांक 19 बाहेरील मोकळ्या पॅसेजमध्ये शुक्रवारी रात्री एक वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत ही घटना घडली. कुर्ल्यामध्ये वास्तव्यास असलेल्या आरोपी नराधम अन्सारी याने त्याच्या बाजूला झोपलेल्या 12 वर्षीय पिडीत मुलासोबत लैंगिक चाळे केले. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने याची वाच्यता केल्यास मुलाला मारण्याची धमकीसूद्धा दिली.

मुलाच्या वागण्यात झालेला बदल शनिवारी सकाळी पालकांच्या लक्षात आला. त्यांनी मुलाकडे विचारपूस केल्यानंतर त्याने अन्सारीने केलेल्या कृत्याबाबत सांगितले. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी अन्सारी याला ताब्यात घेत सायन पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात भादंवी कलम आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

ही बातमी पण वाचा : प्लास्टीक गोण्या अंगावर पडल्याने गुदमरुन कामगाराचा मृत्यू