सेक्स सीडीप्रकरण : कर्नाटकातील त्या मंत्र्याचा राजीनामा

Ramesh Jarkiholi

बंगळुरू : सेक्स सीडीप्रकरणी अडचणीत आलेल्या कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांनी अखेर आज राजीनामा दिला आहे. या प्रकरणी मंगळवारी एक व्हिडीओ माध्यमांमध्ये समोर आला होता. या व्हिडीओमध्ये रमेश जारकीहोली (Ramesh Jarkiholi) हे एका महिलेसह आक्षेपार्ह परिस्थितीत दिसून येत आहेत. या महिलेला नोकरी देण्याच्या निमित्ताने रमेश यांनी या महिलेचे शोषण केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी केला होता. रमेश यांनी आज मुख्यमंत्री येदीयुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला. येदीयुरप्पा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. तसेच, या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी रमेश यांनी केली आहे. दरम्यान, रमेश यांचे भाऊ आमदार बालचंद्र जारकीहोली यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER