‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावरून नेत्यांमध्येच मतभेद

electronic voting machine

नाशिक :- बऱ्याच निवडणुकांतील पराभव पाहून काँग्रेससह अनेक पक्ष इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला विरोध करतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ‘ईव्हीएम’ (EVM) व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे. हा कायदा महाराष्ट्र विधानमंडळाने तयार करावा, अशा सूचना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्ष असताना दिल्या होत्या. मात्र पुन्हा या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्येच मतभेद होत आहेत.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘ईव्हीएम’ मशीन मतांची अचूक संख्या दाखवते, हे वैयक्तिक अनुभवावरून सांगतो. कार्यकर्त्यांना चांगले बहुमत मिळाले तर सर्व ठीक, डिपॉझिट जप्त झाले तर म्हणतात ‘ईव्हीएम’नी मॅनेज केले आहे. असे काही नाही, ईव्हीएम ठीक सुरू आहे, त्यात पेपरलेस काम होते. ‘ईव्हीएम’वर माझा संपूर्ण विश्वास आहे.” असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांनी काय करावे हे नियम घालून दिले आहेत. हा विषय सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येतो. आपला देश सुधारणेकडे चालला आहे. त्यामुळे मतपत्रिकेवरून आपण ‘ईव्हीएम’ आणले. आता उलटा प्रवास होताना दिसत आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केले होते. “भाजपाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. मतपत्रिकेचा वापर व्हावा यासाठी कायदा करावा. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी. यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका आहे.” असेदेखील सचिन सावंत म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER