अनेक जिल्ह्यातील शिक्षक कोरोना पॉझेटिव्ह; उद्यापासून शाळा होणार सुरू ?

निर्णय स्थानिक प्रशासनावर अवलंबून

School

मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, तसेच शाळा सुरु करण्याचा निर्णय पूर्णतः स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, पुणे, औरंगाबादपाठापोठ आता नाशिकमधीलही शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. या स्थितीत शाळा सुरु करण्याच निर्णय कितपत योग्य असेल असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

मुंबई आणि ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २३ तारखेपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचे पूर्वीचे आदेश असल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी केली जात असून त्यात अनेक शिक्षक पॉझिटिव्ह आढळलेत.

कोरोना पॉझिटिव्ह शिक्षक – कर्मचाऱ्यांची आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागांतील १७८ शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत. सोलापूर शहरात आतापर्यंत प्राप्त झालेले सर्व ३३० अहवाल निगेटिव्ह आहेत. ग्रामीण भागात जवळपास १० हजार ७९९ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सर्वाधिक पंढरपूर तालुक्यातील ६६ शिक्षक, मंगळवेढा तालुक्यातील २२ सांगोला २१, माळशिरस २०, बार्शी १५ शिक्षकांचे अहवाल पॉसिटीव्ह आहेत.

नाशिकमधील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. ४ जानेवारी पासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४५ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीणमध्ये ३७ तर नाशिक शहरात ८ शिक्षक पॉझिटीव्ह असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात ४१ शिक्षक कोरोना पॅाझिटीव्ह आहेत. ग्रामीण भागांत २५ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूर शहरात १६ शिक्षकांचे रिपोर्ट पॅाजिटीव्ह आहेत.

निर्णय स्थगित करा; मराठवाडा शिक्षक संघ

सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे. परळीचे तालुका सचिव बंडू आघाव यांनी शाळा सुरू करु नयेत अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER