सातव हे उभरते नेतृत्व होते, मी माझा संसदेतील मित्र गमावला’; पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

Maharashtra Today

मुंबई :- काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे आज रविवारी निधन झाले. त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. अवघ्या ४६व्या वर्षी राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १ हजार ७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. त्यांची संसदेत ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चारवेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘राजीव सातव हे उभरते नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींचे ट्विट

“राजीव सातव यांच्या जाण्याने संसदेतील माझा मित्र गमावला. सातव हे उभारते नेतृत्व होते. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो.” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.