कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना पवारांकडून न्याय, सातवा वेतन आयोग लवकरच

Sharad Pawar

मुंबई : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील (Agricultural university staff) कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सातवा वेतन अयोग्य लागू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यापीठांच्या प्रतिनिधींना दिले आहे. चारही कृषी विद्यापीठाच्या समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी शरद पवार (Sharad Pawar) व कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. तेव्हा हे आश्‍वासन मिळाले, अशी माहिती कर्मचारी प्रतिनिधींनी दिली.

च प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. पवार यांची समन्वय समितीची भूमिका ऐकून घेतली व कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर समन्वय समितीच्या सदस्यांनी मंत्रालयात जाऊन कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली असता, त्यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल. लवकरच आपण हा विषय कॅबिनेट मिटींगसमोर ठेवू, असे आश्‍वासन दिल्याची माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव सुनील दळवी यांनी दिली. या संदर्भात डॉ. सी. डी. देवकर (राहुरी कृषी विद्यापीठ), डॉ. विठ्ठल नाईक, सुनील दळवी (कोकण कृषी विद्यापीठ दापोली), डॉ. दिलीप मोरे (परभणी कृषी विद्यापीठ), डॉ. संजय कोकाटे (अकोला कृषी विद्यापीठ) हे प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

ही बातमी पण वाचा : वंचित बहुजन आघाडी आणि भाजपला धक्का, अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER