आणखी सात नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena

सिंधुदुर्ग :- भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वागणुकीला कंटाळून सात राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करत आहे. असा टोला शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिला. प्रवेश करणारे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि नगरसेवक आहेत. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दौऱ्यानंतर हे सात कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र भाजपा नेते नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे या नेत्यांच्या जाण्याने भाजपाला काही फरक पडणार नाही, असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी केला. या नगरपंचायतीत संपूर्ण १७ जागा भाजपाच जिंकेल, असेदेखील ते म्हणाले.

या सात नगरसेवकांनी आरक्षण मिळणार नसल्यामुळे हे पाऊल उचलले आहे. भाजपा मजबूत आहे. अमित शहा आल्यानंतर भाजपा आणखी मजबूत झाला आहे. जिथे जिथे अमित शहांचे पाय लागतात तिथे तिथे भाजपाचे कमळ फुलते. भाजपा मजबुतीने सामोरे जाईल, असे राजन तेली म्हणाले.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादीला अधिक जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार, मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना नेत्यांची स्वबळाची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER