तरुणाची सात लाखांची फसवणूक

Fraud

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा चांगला परतावा देतो असे सांगून मुडशिंगी येथील संतोष कांबळे या युवकाची ७ लाखांची फसणूक केल्याची घटना घडली आहे. विलास गणपती वाघमारे असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

राजारामपुरी ५ व्या गल्लीत दिशा अकॅडमी या नावाने मुंबई मुलुंड येथे राहणारा संशयित विलास गणपती वाघमारे याने ऑफिस सुरू केले. ऑफिसमध्ये बोलावून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा चांगला परतावा देतो असे सांगून गड मुडशिंगी येथील संतोष कांबळे या युवकाची ७ लाखांची फसणूक केली आहे. अशी फिर्याद संतोष कांबळे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.