महापौर निवडणुकीच्यावेळी भाजपाचे सात नगरसेवक नॉट रिचेबल

सांगली : आज सांगली मिरज कुपवाड मनपाच्या महापौरपदासाठी निवडणूक (Mayor election) होणार आहे. ही निवडणूक ऑनलाइन पद्धतीने होणार. या पदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासाठी भाजपाला (BJP) सत्ता टिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यात भाजपाचे सात नगरसेवक (BJP corporators) बेपत्ता आहे.

सत्ताधारी भाजपामध्ये फूट

सांगलीत महापौर, उपमहापौर निवडीवरून भाजपामध्ये फूट पडले आहे. यात सात नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. या बैठकीला ३० ते ३२ नगरसेवक उपस्थित होते. भाजपाने तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखले. मात्र या नगरसेवकांना गोव्याला पाठवण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते ‘ऍक्शन मोड’मध्ये

भाजपाची नावे निश्चित होताच राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. भाजपाच्या नाराज नगरसेवकांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू झाले.

सांगली महापौरपदासाठी इच्छुक कोण?

सांगलीच्या महापौर गीता सुतार यांची मुदत २१ फेब्रुवारीला संपणार होती. या महापौर पदासाठी भाजपामधील इच्छुकांची संख्या वाढली. या पदासाठी भाजपाकडून स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, गणेश माळी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत होती. संख्या जास्त असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना सांगलीत बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER