काही शेतकरी नेत्यांची कारखानदारांशी सेटलमेंट : रघुनाथदादा पाटील

Raghunath dada Patil

सांगली : काही शेतकरी संघटनांना कारखानदारांशी सेटलमेंट करून एफआरपीचे दर पाडत आहेत. या संघटना सरकारमान्य शेतकरी संघटना बनल्या आहेत. त्यांचा सरकारी धोरणांना पाठींबा असल्याचे सांगत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर नाव न घेता आज मिरज येते केले.

पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिवावर संघटना काढून काहींनी मंत्रीपदे भोगली तर काहीजण आमदारकीच्या मागे लागले आहेत. या संघटनांचा सरळसरळ सरकारी धोरणांना पाठिंबा आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता थेट कारखानदारांशीच सेटलमेंट करून एफआरीचे दर पाडले जात आहेत. कारखानदारांना 2 हजार 850 रुपये एफआरपी देणे परवडत असताना सेटलमेंट करून 2 हजार 200 रुपये एफआरपी घेतली जात आहे. याचा संघटना आणि कारखाना या दोघांना फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र फसवणूक होत आहे.

ऊसावर सर्व प्रक्रिया करून कारखानदारांनी प्रतिटन 4 हजार रुपये दर दिला पाहिजे. परंतू तथाकथित शेतकरी नेते हा फरक का मागत नाहीत? असा सवाल करून त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दि. 28 नाव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान जनप्रबोधन यात्रा काढणार असल्याचे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER