पुण्यात ठरले, शिवाजी विद्यापीठात का नाही?

Shivaji University

सांगली : पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षेचे नियेजन केले आहे. त्यामध्ये बॅकलॉग सबजेक्ट परीक्षांचे नियोजन एक ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत आहे. नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा दहा ते ३०ऑक्टोबर या कालावधीत आहेत.या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्नाद्वारे (एमसीक्यू) एक तासाची परीक्षा असणार आहे.

कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. पंधरा दिवसावर परीक्षा येऊन ठेपल्या आहेत. मात्र परीक्षा २५ की ५० प्रश्नांची घ्यायची यासंबंधी अजूनही शिवाजी विद्यापीठा तील अभ्यास मंडळाचे चेअरमन आणि अधिष्ठाता पातळीवर निर्णय झाला नाही. अधिकार मंडळातील या प्रमुख पातळीवरील निर्णय रखडल्यामुळे रिपिटर व अंतिम सत्राची परीक्षा किती प्रश्नांची असणार यासंबंधी संभ्रमावस्था कायम आहे. परीक्षा किती प्रश्नांची हे न ठरल्यामुळे अद्याप क्वेशन बँक तयार झाल्या नाहीत. रिपिटर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे अधिकार कॉलेजला दिले आहेत, मात्र अभ्यास मंडळ व अधिष्ठाता स्तरावरुन परीक्षेतील एकूण प्रश्नांचे गणित न सुटल्यामुळे कॉलेज व्यवस्थापनही गोंधळले आहे.

ही परीक्षा ५० गुणांची एका तासाच्या कालावधीत होईल.यासाठी दिलेल्या ६० बहुपर्यायी प्रश्नापैकी ५० प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील. या परीक्षेमध्ये ४० टक्के सोपे, ४० टक्के मध्यम व २० टक्के कठीण या काठिण्यपातळचे प्रश्न असतील असे पुणे विद्यापीठाने म्हटले आहे. पुणे विद्यापीठाने परीक्षा किती प्रश्नांची घ्यायची हे निश्चित केले आहे. पुणे आणि शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नितीन करमळकर आहेत. पुणे येथे जलदगतीने निर्णय होतो. मग शिवाजी विद्यापीठात विलंब का ? त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन, अभ्यास मंडळ चेअरमन व अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करुन परीक्षा किती प्रश्नांची घ्यायची यासंबंधी निकाल द्यावा असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER