शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना धक्का, मूळ गावातील ग्राम पंचायतमधील एकमेव सदस्य शिवबंधनात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेलं खानापूर गाव सर्वाधिक चर्चेत असत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं हे मूळगाव असून शिवसेना (Shivsena) आमदार प्रकाश आबीटकर (Prakash Abitkar) यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर परत एकदा आबीटकर यांनी मोठा धक्का दिला आहे. दरगड तालुका पंचायतीमधील भाजपच्या एकमेव सदस्या आक्काताई नलावडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आक्काताई नलावडे या आकुर्डे पंचायत समिती मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. शिवसेना खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आक्काताई नलावडे यांनी शिवबंधन बांधलं. चंद्रकांतदादांचं गाव असलेल्या पंचायत समितीमधील सदस्यच शिवसेनेच्या गळाला लागल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यावेळी खासदार संजयदादा मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळचे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button