कोल्हापुरात जम्बो कोविड सेंटर उभे करा – खासदार संभाजीराजे छत्रपती

Sambhaji Raje Chhatrapati

मुंबई : बी के सी मुंबई-ठाणे, पुणे च्या धर्तीवर कोल्हापुरातही (Kolhapur) जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर उभे करण्यात यावे. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्याला तात्काळ जास्तीत जास्त मदत करण्यात यावी अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या करिता देखील एक निवेदन त्यांच्या तर्फे पाठवून दिले. खास बाब म्हणून राज्य आपत्कालीन निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी च्या माध्यमातून आवश्यक निधी देण्यात यावा अशी आग्रही मागणी खा.संभाजीराजे यांनी केली.

याप्रसंगी खा.संभाजीराजे छत्रपती यांनी विनंती केली की कोल्हापूरातील खासगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत सामील करण्यात यावे. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेला कॉरोना चे गुणवत्तापूर्ण उपचार घेता येतील.

याप्रसंगी मंत्री महोदयांनी राज्य शासन योग्य ती पावले लवकरात लवकर उचलेल असे सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोल्हापूर येथील परिस्थितीचे गांभिर्य त्यांच्यापर्यंत पोहचवतो असा शब्दही त्यांनी दिला. त्यांच्या नगर विकास मंत्रालयाकडून जे जे शक्य, त्याची तात्काळ पूर्तता करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरातील रुग्णांकरिता अत्याधुनिक जम्बो कोविड केंद्र उभारण्यासाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल असा शब्द सुद्धा त्यांनी दिला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा कोविड केंद्र उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER