घरपोच लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्व निश्चित करा- मनोज कोटक

Manoj Kotak - Home Vaccination

मुंबई : घरोघरी जाऊन (Doorstep Vaccination) कोरोना प्रतिबंधक लस (Coronavirus Vaccine) देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व निश्चित करा, अशी विनंती करणारे पत्र भाजपाचे (BJP) लोकसभेचे खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांनी २९ एप्रिल रोजी बृहनमुंबई महापालिकेच्या आयुक्तांना लिहिले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत वैद्यकीय आराखडा घेऊन आमच्याशी संपर्क केला. या संस्थेने म्हटले आहे की, आम्हाला लसीकरणाची परवानगी मिळाली तर आम्ही चाळींपासून सोसायटींमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचे घरपोच लसीकरण करू.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात मदत करावी म्हणून मी इतरही संस्थांशी संपर्क करतो आहे. १ मेपासून सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणा काम करत आहेत; पण सर्वांना लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचणे सोपे नाही. यामुळे जे लसीकरण केंद्रापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांचे घरपोच लसीकरण करण्याची व्यवस्था झाली पाहिजे, असे कोटक यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button