अधिवेशन १ मार्च पासून सुरु होणारच : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

सांगली : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरल्याप्रमाणे १ मार्च पासून सुरु होणारच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रश्नच नाही, अशी स्पष्टोकती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

कोरोनाचा (Corona) बाव करुन राज्य सरकार अधिवेशन पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात आहे. हे सरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. असा आरोप भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला होता. या आरोपाचे खंडण करताना ना. मुंडे म्हणाले, कोरोना रुग्णांचा देशभरातील वाढता आकडा चंद्रकांत दादांना बहुतेक दिसत नसावा. राज्याच्या, देशाच्या जनतेच्या आरोग्या संदर्भात तडजोड करु नये, अशी भूमिका कुठल्याही सरकारची असतेच. जनतेच्या आरोग्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. अधिवेशन ठरलेल्या तारखेला १ मार्च ते १९ मार्चला होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नापासून पळून जाण्याचा प्रश्नच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER