जिल्हाधिकारी आणि आयपीएस बहीण यांची साताऱ्यात सेवा : दुर्मिळ योगायोग

सातारा : राज्य पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) (DYSP) पदाच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील सहा डीवायएसपींच्या बदल्या झाल्या असून सातारा उपविभागीय कार्यालयासाठी आंचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे. दलाल या जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांच्या बहीण असून बहीण-भावाची एकाच जिल्ह्यात नियुक्ती ही दुर्मीळ बाब आहे.

कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. तीनवेळा कोरोनामुळे या बदल्यांना मुदतवाढ मिळाली. गेल्या 15 दिवसांपासून मात्र पोलिस दलात बदल्यांना वेग आला आहे. नुकतेच आयपीएसचे दोनवेळा गॅझेट झाले आहे. अशातच बुधवारी रात्री पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्या बदल्यात नवे पोलिस अधिकारीही जिल्ह्याला मिळाले आहेत.

सातारा जिल्ह्यात बदलून आलेल्यामध्ये प्रामुख्याने सातारा पोलिस उपविभागीय कार्यालयासाठी पुणे ग्रामीणमधून आंचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे. त्या आयपीएस आहेत. यामुळे साताऱ्यात त्या सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून सेवा बजावतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER