आता सीरम करणार रशियाच्या स्पुतनिक-वी लसीची निर्मिती? केंद्राला मागितली परवागनी

Sputnik-V vaccine

पुणे : पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (serum institute of india) येत्या काही दिवसातच भारतात रशियन स्पुटनिक लस (Sputnik-V vaccine) तयार करू शकते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे रशियाच्या स्पुतनिक वी या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीसाठी टेस्ट लायसन्स मागितलं आहे. वृत्तसंस्था एएनआयनं आपल्या सूत्रांकडून ही माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं बुधवारी डीसीजीआयला स्पुतनिक वी लसीच्या निर्मितीसाठी चाचणी परवाना देण्यासंबंधी अर्ज केल्याची माहिती आहे. रशियाची स्पुतनिक वी लस सध्या भारतात तयार करण्याचं काम डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी करत आहे.दुसरीकडे सीरमनं जून महिन्यात भारत सरकारला कोविशील्ड लसीचे १० कोटी डोस पुरवणार असल्याचं यापूर्वीचं जाहीर केलं आहे. देशात आपात्कालीन वापरासाठी रशियाच्या स्पुटनिक-व्ही या लसीची १२ एप्रिल रोजी नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर १४ मे पासून या लसीचा वापर सुरू करण्यात आला. आरडीआयएफ आणि पॅनासिआ बायोटेक यांनी स्पुटनिक व्ही लसीचे वर्षाला १० कोटी डोस बनवण्याविषयी सहमती दर्शवली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही लस वयस्कांमध्ये सुमारे ८३ टक्के प्रभावी आहे.

दरम्यान, फायझर आणि मॉडर्ना या परदेशी कंपन्यांना सरकारने नुकसान भरपाई आणि स्थानिक चाचण्यांमधून सूट दिल्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूटनेही गुणवत्तेबाबत केलेल्या कारवाईसाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सीरमने कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळवण्याची मागणी केली आहे.

बुधवारी भारताच्या औषध नियामक मंडळाने फायझर आणि मॉडर्ना या परदेशी लसींसाठी स्वतंत्र चाचण्या घेण्याची अट दूर केली होती. ज्या लसी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केल्या आहेत त्या लसींची भारतात चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही असे सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूटनेही आता कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळवण्याची मागणी केली आहे. सर्वांसाठी एकच नियम लावण्यात यावा अशी मागणी सीरमने केली आहे. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button