सिरम इन्स्टीट्युटची आग नियंत्रणात, आरोप करणा-यांना संयमाची लस द्यावी लागेल – मुख्यमंत्री

Cm Uddhav Thackeray & Serum Intitute

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची आज मोठी घटना घडली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीरमला लागलेली आग नियंत्रणात आहे. मी फोन करुन कोणाला डिस्टर्ब केलं नाही. त्यांना काम करु द्या. काम झाल्यानंतर आपण सगळी माहिती घेऊ. अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्तम काम केलं. जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतली. आत जे कोणी अडकलं होतं त्यांना बाहेर काढलं.लस सुरक्षित ठेवणं मग ती BCG असो वा कोव्हिशिल्ड त्याला प्राधान्य आहे. आग विझू द्या, सर्वांशी संपर्क करुन अधिक माहिती घेऊ.

दरम्यान, सिरमलाला लागलेल्या आगीनंतर विरोधकांकडून आरोप प्रत्यारेप होत आहेत. याविषयी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जे आरोप करत आहेत , त्यांच्या कडे ही सर्व माहिती कशी जाते? सर्जिकल स्ट्राईकसारखी माहिती त्यांना आधी कशी कळते? जे आरोप करत आहेत त्यांना संयमाची लस द्यावी लागेल, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.

दरम्यान, आता आग आटोक्यात आली आहे. दुपारी दोन वाजताची ही घटना आहे. आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते. सुदैवाने कोव्हीशिल्ड लस पुर्णपणे सुरक्षीत आहे. जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेटनंबर ३,४ आणि ५ या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे. आगीसंदर्भात कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे महापालिका आयुक्तांच्या संपर्कात आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीसंदर्भात माहिती घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक सूचना केल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER