सीरमची आग : मृतकांच्या परिवाराला २५ लाखांची मदत – सायरस पुनावाला

Cyrus Poonawalla - Serum Institute Fire

पुणे : सीरमला (Serum Institute) लागलेल्या आगीत ५ कामगारांचा मृत्यू झाला. सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी यांनी प्रत्येक मृतकाच्या कुटुंबासाठी २५ लाख रुपयांची मदत घोषित केली.

सायरस एस. पुनावाला यांनी एक निवेदन जारी करून या संपूर्ण घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. सीरमसाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या नवीन निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटुंबांना जी रक्कम मिळायची आहे ती मिळेलच मात्र, आम्ही प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत या पाचही मृतांच्या कुटुंबीयांना देत आहोत, असे पुनावाला यांनी जाहीर केले.

सीरममधील आग दुर्घटनेचा संपूर्ण तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे व आवश्यक सर्व सूचना दिल्या आहेत. सीरमचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांच्याशीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली असून उद्या शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER