सीरम मधली आग : तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून जीव वाचवला, पण भाऊ खाली आलाच नाही …

Fire At Serum Institute

पुणे : पुण्यातील (Pune) सीरम इन्टिट्यूटमध्ये (Serum Institute of India) लागलेल्या आगीत तिथे काम करणाऱ्या अविनाश कुमार या कामगाराने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीव वाचवला पण, त्याच्यासोबत काम करणारा त्याचा भाऊ बिपीन मात्र खाली आलाच नाही …

अविनाश कुमार याने एका वृत्तपत्राला सांगितले की, मी आणि माझा भाऊ बिपीन २२ तारखेपासून तिथे काम करतो आहे. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावरुन धूर निघत असताना दिसला. थोड्या वेळात आगीचे लोळ दिसू लागले. सगळीकडे धूर आणि आग दिसत होती. आमची जीव वाचविण्यासाठी धावपळ उडाली. मी भावाला ‘भाई चलो जल्दी’ म्हणून आवाज दिला. पण तो काही आला नाही. मी तिसऱ्या मजल्यावरील खिडकीजवळ आलो आणि खाली वाळूच्या ढिगाऱ्यावर उडी मारली. त्यामुळे माझा जीव वाचला. पण माझा भाऊ आलाच नाही, सांगताना अविनाश कुमारचा अश्रूंचा बांध फुटला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER