मुंबईचे रस्ते रक्ताने माखणारा सिरिअल किलर बिअर मॅन

Serial killer beer man spilling blood

तुम्ही सिरिअल किलर्सचे अनेक किस्से ऐकले असतील. त्यांच्याबद्दल वाचलं असेल. जगरात अशा अनेक घटना घडल्यात ज्यात सामान्य लोकांची हत्या सिरिअल किलरने केल्यात. भारतातही अशा अनेक केसेस समोर आल्या ज्या जगभरात गाजल्या. त्यातलीच एक बिअर मॅनची गोष्ट.. ज्यानं दक्षिण मुंबईतल्या नागरिकांच्या आयष्यात दहशत निर्माण केली.

३ महिन्यात ७ हत्या

ऑक्टोबर २००६ची सकाळ मरीन लाईन स्टेशनच्या फुटओव्हर ब्रीजवर एक मृतदेह आढळला. एका टॅक्सी ड्रायव्हरचा. विजय गौड असं त्याच नाव. ज्याच्यावर वार करुन हत्या करण्यात आली होती. यानंतर दोन महिन्यात चर्चगेट स्टेशनवर १४ डिसेंबरला एकाचा मृतदेह आढळला. याच्याजवळ किंगफिशर बिअरची एक बाटली सापडली. याच प्रकारे १३ जानेवारीपर्यंत पोलिसांना अशा ७ हत्या झाल्या. या सर्व हत्यांमध्ये एक साम्य होतं ते म्हणजे किंगफिशरच्या बिअरची बाटली.

पहिल्या हत्येच्या तपास नंतरच्या काळात तपास थंडावला. पण या ७ हत्यांनंतर हा मुद्दा माध्यामांनी उचलून धरला. पोलिसांनी तपास सुरु केला.

बिअरच्या रिकाम्या बाटल्यांमुळं पडलं बिअर मॅन नाव

या खुन्याचं न नाव समोर आलं होतं न इतर कोणती माहिती. पण प्रत्येक मृतदेहाजवळ बिअरची रिकामी बाटली सापडायची त्याच्यामुळं या खुन्याच नाव बिअर मॅन ठेवण्यात आलं. या बिअर मॅनवर ऑक्टोबर २००६ ते फेब्रुवारी २००७पर्यंत ७ लोकांच्या हत्येचा आरोप होता.

पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण काहीच सुगावा लागला नाही. खुन झालेल्या ठिकाणी तपास केला तर बिअरच्या रिकाम्या बाटली शिवाय दुसरं तिथं काहीच सापडत नव्हतं. झोपडपट्टीत राहणाऱ्या, फुटपाथवर झोपणाऱ्यांना मारुन अरबी समु्द्राजवळ तो फेकायचा. पोलिस आणि खुन्याच्या दरम्यान एकमात्र लिंक होती ती म्हणजे बिअरची रिकामी बाटली. अशात पोलिसांनी तपास तीव्र केला. हत्याऱ्याला शोधण्यासाठी पोलिसांनी ८० सदस्यांच्या विशेष पथकाची बांधणी केली.

शेवटी धोबी घाटवर २२ जानेवारी २००७ला पोलिसांनी रविंद्र कांतरोल नावाच्या व्यक्तीला संशयाच्या अधारावर अटक केली. अनेक वर्तमानपत्रांनी तोच बिअरमॅन असल्याचं सांगायला सुरुवात केली. काही वर्तमानपत्रांनी लिहलं की याआधी त्याने ४५ जणांना मारुन समुद्रात फेकून दिलंय. काहींचं म्हणनं होतं की काळ्या जादूसाठी त्याने या हत्या केल्यात.

१५ जणांच्या हत्या केल्याची दिली कबूली

फेब्रुवारी २००७ला नार्को टेस्टमध्ये रविंद्र कांतरोलनं १५ लोकांना मारल्याच कबूल केलं. चरसच्या नशेत असताना त्यानं या हत्या केल्याची कबूली त्यांने दिली. चरस घेल्यानंतर कांतरोल उग्र व्हायचा आणि शिकार शोधायला बाहेर पडायचा.

यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. बिअर मॅनच्या दहशतीपासून त्यांची मुक्ती झाली खरी पण हे समाधान फार काळ टिकणारं नव्हतं.

पुराव्या अभावी आरोपीची सुटका

१७ सप्टेंबर २००७ला पुराव्यांअभावी आरोपीची सुटका करण्यात आली. पोलिसांद्रवारे सादर करण्यात आलेल्या नारको टेस्टचे रिपोर्ट कोर्टाने नाकारले. कांतरोलची निर्दोष सुटका झाली. याआधी केस मजबूत करायला पोलिसांनी कांतरोलची नार्को टेस्ट, पॉलग्राफ रिपोर्ट, ब्रेन मॅपिंगचे रिपोर्ट जोडले होते. पण तरीही कायद्याच्या कचाट्यातून आरोपी निसटला.

३ मुलींच्या हत्येनं मुंबई हादरली

यानंतर ३ तरुणींचे मृतदेह आढळले. मारण्याआधी या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. तिन्ही हत्येत तीन तीन महिन्याच अंतर होतं. मुलींच वय ३-४ वर्षांच्यामध्ये होतं. यातली एक मुलगी होती जागृती पटेल. नरिमन पॉइंटच्या फायर ब्रिगेड स्टेशन जवळ तिचा मृतदेह आढळला होता.

दुसरी होती अँजल शर्मा, तिचा मृतदेह २००७ला मेकर टॉवरजवळ सापडला. तिन्ही मुलींच्या डीएनएशी कांतरोलचा डीएनए मॅच करण्यात आला पण तो मॅच झाला नाही. त्याला पुन्हा सोडण्यात आलं.

यानंतर तो २०व्या वर्षी तो मुंबईच्या राणे गँगमध्ये सामील झाला. बेकायदेशीर दारू विक्री, वसूली अशी कामं त्यानं सुरु केली. यात तो अनेकदा जेलमध्ये गेला. एकदा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यानं धर्म बदलला. रविंद्र कांतरोल अब्दूल रहीम बनला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER