सेरेनाचा बहिण व्हिनसशी सामना झालाच नाही!

गुडघ्याच्या दुखण्याने स्पर्धेतून घेतली माघार

Serena

रोम :- इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स उत्सुकता लागून राहिलेला थोरली बहिण व्हिनस विल्यम्सविरुध्दचा सामना झालाच नाही,. आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेरेनाने दुसऱ्या फेरीचा हा सामना खेळण्यास असमर्थता दर्शवली.

त्यामुळे या दोन्ही बहिणींची युरोपियन क्ले कोर्टवर तब्बल 17 वर्षांनी होऊ घातलेली लढत झालीच नाही. सेरेनाच्या या दुखापतीमुळे ती महिनाअखेरच्या फ्रेंच ओपनमध्येसहभागी होईल का, याबद्दल शंकाच आहे. 37 वर्षीय सेरेना सध्या क्रमवारीत 11 व्या स्थानी आहे. तिने गेल्यावर्षीसुध्दा फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती. त्यामुळे मारिया शारापोव्हाविरुध्दचा तिचा बहुप्रतिक्षित सामना होऊ शकला नव्हता.

23 ग्रँड स्लॕम विजेतेपद नावावर असलेली यंदा सातत्याने तब्येतीच्या कारणाने स्पर्धा सोडत आहे.जानेवारी तील अॉस्ट्रेलियन ओपननंतर तिने फक्त दोनच सामने खेळले आहेत. डाव्या गुडघ्यात दुखण्यामुळे मला स्पर्धा सोडणे भागच होते. मला उपचारांकडे लक्ष देणे आवाश्यक आहे असे सेरेनाने म्हटले आहे.